वनरक्षकांनी वाचवला एका कोल्ह्याचा जीव

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस ता. सरगरवाडी प्राणी, पशू हे मानवाच्या रहिवासी क्षेत्रामध्ये येत असल्याच्या घटना घडत असतात. संकटात सापडलेल्या वन्य जीवांना वाचवण्यासाठी मानव प्रयत्नशील असतो . सरगरवाडी येथे अनिल काळे यांच्या विहिरीमध्ये कोल्हा पडल्याने भगवान तांबे वनरक्षक आणि के डब्लू शेख घटनास्थळी जाऊन विहिरीमध्ये खाट सोडून कोल्हा सुरक्षितपणे विहिरीच्या बाहेर काढला आणि मुळ अधिवासात सोडून देण्यात आला .सदरची कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .
माळशिरस सरगरवाडी येथील अनिक काळे यांच्या विहिरीमध्ये पडलेला कोल्हा दिसताच काळे यांनी तत्काळ व लगेच संर्पक केल्यामुळे वनविभागाने अथक प्रयत्न करून कोल्याचा जिव वाचवला व त्यांना वन्य अधिवासात सोडून दिले.
यावेळी वनरक्षक भगवान तांबे व के डब्ल्यु शेख तसेच वनमजुर दत्तू काळे ,उत्तम गोरड ,मामा हुलगे , दादा सूळ , आजिनाथ गोरड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.कोल्ह्याला सुरक्षितपणे बाहेर काढून कायदेशीरपणे पंचनामा करून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडल्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाचे कौतुक केले.