निंबवडे येथे अनोळखी व्यक्तीचा खून

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे झरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेस गट नंबर ९८ मध्ये ५५ ते ६० वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा खून झालेला मृतदेह आढळला.
याबाबत आटपाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २६ ऑक्टोबर रोजी १०.३० वाजण्याच्या पूर्वी निंबवडे गावच्या हद्दीत निंबवडे ते झरे जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्या पूर्वेस विक्रम वामन देवडकर यांच्या जमीन गट नंबर ९८ मध्ये एका अनोळखी पुरुषाचा अज्ञात हत्याराने डोक्यात व गुप्त भागाजवळ मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील प्रवीण तुकाराम मंडले यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी भेट दिली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत.