
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड
म्हसवड पोलीसांनी शिरताव ता माण येथील हातभट्टी दारु तयार करत असताना दत्ता शिवाजी चव्हाण यांच्या हातभट्टी दारु अड्ड्यावर छापा टाकून एकूण २० हजार ५०० रुपए किमतीचा मुद्देमाल जप्त केला याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी म्हसवड पोलीसांना शिरताव ता माण येथील दत्ता चव्हाण हा हातभट्टीची दारु काढत असल्याची खबर मिळताच गुरुवार दि १९ रोजी संध्याकाळी सात वाजनेच्या दरम्यान सपोनी राजकुमार भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली अनिल विलास वाघमोडे, नवनाथ हरिबा शिरकुळे, नीता पळे, सतीश जाधव,तानाजी यादव.हरी लोखंडे यांनी शिरताव येथील दारु भट्टीवर छापा टाकूण ५ लिटर हातभट्टी दारु ,दारु तयार करण्याच्या रसायणासह इतर सर्व साहीत्य असा एकूण २० हजार ५०० रुपए किमतीचा मुद्देमाल जप्त केला यावेळी आरोपी दत्ता चव्हाण पळून जाण्यात यशस्वी झाला असून म्हसवड पोलीस त्याचा शोध घेत आहेत

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या