आरेवाडीचा दसरा मेळावा म्हणजे बहूजनांच्या विचारांची सोनेरी खाण!

भाई शिवराम मासाळ
बळीराजा फौंडेशन
9922173284

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / आटपाडी
आरेवाडीचा दसरा मेळावा फक्त आरक्षण अंमलबजावणी चळवळ म्हणून बघू नका मित्रांनो आपण एक वर्षात काय केले, तो आपण सर्व बहूजन एकत्रीत घेतलेला मागोवा आहे. मागील वर्षीत केलेला संकल्प व आपल्या नेत्यांने प्रबोधन करून रूजवलेली शब्दरूपी बिजे अंकुरली, बहरली की कुजली हे तपासायची प्रयोगशाळा म्हणून आरेवाडीला दरवर्षी यायचे असते, मागील दसरा मेळाव्यात आपले नेते आमदार गोपिचंद पडळकरांच्या संकल्पनेतून राजे मल्हारराव होळकर यांचे काळाच्या पडद्याआड गेलेले लालपांढर्या रंगाचे बांड निशानामुळे होळकरशाहीचा इतिहास जिवंत झाल्यामुळे ते प्रत्येकाला ऊर्जा देणारे ठरले होते, आज आपण काहीअंशी तरी होळकरशाहीचे बांड निशान सांगू लागलो आहोत.
आपणाला निर्व्यसनी राहण्याचे आव्हान केले होते, जर आपण आपल्या नेत्याच्या विचारांचे पाईक आहोत. तर आपण करत असलेले व्यसन सोडले का? हा प्रश्न स्वतःला विचारा.
आरेवाडीचा दसरा मेळावा म्हणजे आपले सगेसोयरे. मित्रपरिवार तसेच चळवळीत जोडलेला माणूस हा आपला संसार असला पाहिजे, मित्रांनो दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्रातून आपल्या नेत्यांने जोडलेली माणसं आपल्याला विचारांच्या सोन्याची वैचारिक अंघोळ घालणार असतात म्हणून यायचं असते.
आज महाराष्ट्रात धनगर – मराठा आरक्षण चळवळीचा मोठ्या प्रमाणात उठाव झाला आहे, सध्या आरक्षण समजून घेण्यापेक्षा आरक्षणाचा अ माहित नसणारी मंडळी विविध जाती – जमातीतील गोंधळ निर्माण करताना दिसतात.
सध्या मराठा समाज आरक्षण मागतोय म्हणून ओबीसीचा तरूण मराठा समाजाला वैरी समजू लागला आहे. धनगर जमात आरक्षण अंमलबजावणी करा म्हणून शासन दरबारी ओरडून सांगत आहेत व मा. न्यायालयात देखील लढाई लढली जातेय, त्यामुळे आदिवासी व धनगर यांच्यात विस्तव जात नाही. लिंगायत समाज(मुळात लिंगायत समाज नसून तो धर्म आहे.) अल्पसंख्याक दर्जा मिळावा म्हणून रस्त्यावर उतरतोय, ह्यावरून अनेक शंका मनात येतात ह्याचा बोलविता धनी कोण? हे पहिले समजून घेतले पाहिजे जेव्हां जेव्हां देवेंद्र फडणवीस सत्तेच्या केंद्र बिंदू येतात तेव्हाचं विविध मोर्चे, आंदोलने कशी काय उभी राहतात ही देखील शंका निर्माण होते आहे. विविध जाती धर्माच्या तरूणांना पटवून द्यायचे तुमच्या जातीवर खूप मोठा अन्याय झालाय मगं तरूण वर्ग विचारांच्या ऐवजी अपमानाने पेटून उठतोय त्याचाचं फायदा राजकीय पोळी भाजून घेणारी मंडळी घेतात हे षड्यंत्र समजून घेण्यासाठी युवकांनी आरेवाडीला येऊन राज्यावर येऊ घातलेले सुलतानी संकट परतावून लावण्याची व षडयंत्र ओळखून काम करण्याची जबाबदारी आजच्या युवकांच्यावर येऊन ठेपली आहे.
आरक्षणाची दिशा समजून युवकांनी आरक्षण लढ्यात निश्चित सहभागी होऊन, त्यातील लबाडाच्यां टोळीला ओळखून दूर करूयात…
महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनो आरक्षण लढाई ही हक्काची आणी न्यायाची आहे व ती असली पाहीजे त्याचा तिरस्कार कोणीही करू नका.
लोकनेते आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या धनगर आरक्षण जागर यात्रा ही आरक्षण लढाई नसून ही युवकांसाठी आरक्षण साक्षरता चळवळ आहे, पहिले मी इथे गोष्ट मुद्दाम आपल्या पुढे नमूद करतो धनगर आरक्षण मुद्दा आला म्हणजे ताबडतोब गोपिचंद पडळकरांचा चेहरा लोंकाच्यापुढे का येतो? कारण पडळकर एखादा मुद्दा हातात घेतात तेव्हां जिवाच्या अंकातांने लढतात हे महाराष्ट्रातील तमाम बहूजनांना माहित आहे, आज आमदार गोपिचंद पडळकर हे राजकारणातील बहूजनांच्या(मराठा समाज देखील बहूजनचं आहे) गळ्यातील ताईत बनले आहेत.
मराठा क्रांती मोर्चा डिझाईन व्हायच्या अगोदर 2012 साली कवठेमहांकाळच्या तहसील कार्यालयावर मराठा आरक्षण मोर्चा काढणारा पहिला मराठा इतर पुढारी होता हे विसरून चालणार नाही, पडळकरांचा लढा नेहमी वंचितसमूहासाठी राहिल्यामुळे प्रस्थापित पुढाऱ्यानां पडळकर हे नेहमीच दूष्मन वाटले आहेत.
ह्या वर्षीचा 22 ऑक्टोबर रोजीचा दसरा मेळावा खर्या अर्थाने गाजणार आहे तो धनगर आरक्षण अंमलबजावणी चळवळ बाबत कारण आमदार गोपिचंद पडळकर यांनी धनगर जागर यात्रेतून महाराष्ट्र पिंजून काढला आहे, सोबतीला त्यांचे बंधू सांगली जिल्ह्याचे माजी समाज कल्याण सभापती यांनी बहूतांशी संपूर्ण सांगली जिल्ह्यातील धनगर वाड्यावस्त्यावर घोंगडी बैठका घेऊन जागृती केल्याने, धनगर जमात व मायक्रो ओबीसी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, किमान सहा ते सात लाख लोक मेळाव्यास येथील असा ग्राऊंड रिपोर्ट असल्याने मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तेनात केला आहे.
यंदाच्या दसरा मेळाव्यात धनगर जमात अंमलबजावणी बाबत ऊहापोह होईल.
धनगर जमातीच्या आरक्षणाबाबत समाजात विविध चर्चा आहेत, धनगर जमातीस आरक्षण या पूर्वीच आहे मगं कशाला आरक्षण हवे अशा वावड्या उठवणारांची संख्या जास्त परंतू बंधू भगिनींनो धनगर जमातीची आरक्षण मागणीच नाही हे पहिले समजून घेतले पाहिजे, धनगर जमात सध्या भारत सरकारच्या आरक्षण यादीत ओबीसीत समावेश आहे, परंतू धनगर जमातीचे अभ्यासक मराठवाड्याचे अॅड. गुंडोजीराव बनसोडे, लक्ष्मणराव आघडते (गुरूजी) प. महाराष्ट्रातून स्व. इंजिनियर बी. के. कोकरे यांनी नव्वदच्या दशकात आरक्षण अंमलबजावणी चळवळीचे रानं उठवलेचे लक्षात आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री मा. शरदचंद्र पवार यांनी कुठनिती वापरून धनगर जमातीतील अशिक्षित पुढारी यास हाताशी धरून घटनेत नसणारे परंतू जमातीस नकली वातावरण करून एन. टी. क मध्ये समाविष्ट करून आपला डाव साधला आणी धनगर जमात गळ्यात ढोल बांधून नाचू लागली, ह्याचा फायदा शरद पवार यांना नेहमीच झाला, हा डाव ओळखणारे बी. के. कोकरे यांचा मृत्यू गुढरीत्या झाल्यावर प. महाराष्ट्रातून चळवळ काहीअंशी थांबली, त्या नंतर वैचारिक असलेली चळवळ धनगर जमात आडमुठेपणाने लढू लागली, त्यानंतर मुंबईत बनसोडे सर, व आघडते गुरूजी यांनी जमा केलेले पुरावे घेऊन, जे. पी. बघेल, एम. डी, पाचपोळ, व तत्कालीन मुंबई अंधेरी येथील बडे असलेली अधिकारी नांदेडचे मा. मधू शिंदे ह्यांनी ही चळवळ न्यायालयात उभी करताना सोबत अनेक संवगडी जोडले जात असताना अनेकजण त्यास विरोध करत होते, त्याचं वेळी माणदेशाचा कोहिनूर हिरा मा. गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षण प्रश्नांसाठी भारतीय जनता पक्षाला जय श्रीराम म्हणत अखेरचा लढा पुकारला
धनगर जमातीच्या आंदोलनाची मांडणी सोप्या तंत्राने केली, त्यामुळे मेंढ्या चराई करणारांच्या पासून बांधावर मशेरी घासणार्या माता भगिनींना धनगर आरक्षण चळवळ समजून आली, त्यासाठी व्हिडिओ चित्रीकरण असो किंवा नामवंत गायकाकडून गायलेली गाणी असो , त्यामुळे लाखोंच्या संख्येने गर्दी जमा होऊ लागली,आरेवाडीत तर गुजरात मधील पटेल आंदोलनाचे नेते मा. हार्दिक पटेल यांना बोलावून भाजप भिती घालण्याचे तंत्र असो, किंवा भाजप व शिवसेना युतीच्या सरकारवर प्रचंड दबाव आणण्यासाठी अनेक कुलूपत्या, आटकली लोकनेते गोपिचंद पडळकर यांनी लढवल्या त्यात धनगर जमातीचे कुलदैवत, आराध्यदैवत असलेल्या आरेवाडीच्या बिरोबाची शप्पत देखील समाजाला घालून सरकारवर प्रचंड दबाव आणला हे जगजाहीर आहे, त्यामुळे सरकारला आरक्षण अंमलबजावणी बाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात धनगड जमात नाही असे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात लिहून लिहून दिले,त्यामुळे न्यायालयीन लढा सोपा झाला आहे असे मत आरक्षणातील तज्ञ मांडू लागले. त्याच बरोबर जे आदिवासींना ते धनगरांना अशी घोषणा सरकार कडून पडळकरांनी करून घेतली, त्यामुळे पडळकर सर्वसामान्यांच्या ध्यानीमनी नसताना. ठरावीक कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुन्हा भाजप मध्ये दाखल झाले, तेव्हां राजकीय व स्वकीय विरोधक पडळकरांनी दिलेली बिरोबाची शप्पथ सारखी सारखी आठवण करून देऊ लागले, त्या बिनडोकांना माहित नव्हते की ती शपथ हे युद्धनितीचे तंत्र होते, एवढा यांनी जिवाचा आटापिटा केला तरी लोकनेते आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर प्रेम करणारांची संख्या कमी होऊ शकली उलटपक्षी कैकपटीने वाढत आहे. हे शिकायला आणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बहूजनांच्या पोरांच्या सह लोकनेते आमदार श्री. गोपिचंद पडळकरांच्या विचारांचे सोने लुटून विजयादशमी साजरी करण्यासाठी आरेवाडीला दरवर्षी यायचं….
||जय मल्हार ||. ||जय भिम||. ||जय जोती||