
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ सांगली जिल्हा यांच्या वतीने आज प्रांत अधिकारी कार्यालय विटा येथे प्रांत अधिकारी बांदल साहेब यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये वडार समाजाच्या जातीच्या दाखल्या संदर्भात येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा झाली,
वडार समाजाच्या या प्रश्नाला प्रांताधिकारी बांदल साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 1961 सालचा पुरावा नसणाऱ्यांना स्थानिक ग्रह चौकशी अंतर्गत जातीचे दाखले देण्यात यावेत
असे जाहीर करून त्यांच्या विभागाला तसे आदेश दिले,
यावेळी मा. विनायक कलकूटगी, यल्लाप्पा पवार, अनिल निंबाळकर, राजू जाधव,कृष्णा कुऱ्हाडे, गोपाल माने, शेट्टी निंबाळकर यांनी प्रांत अधिकारी बांदल साहेब यांचे आभार मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद