

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कडेगाव
सांगली जिल्हयात ता. कडेगांव येथे अष्टदेवी व नवग्रहाचे मंदिर हे मोठे भक्तिपिठ आहे. या मंदिरात श्री तुळजाभवानी, श्री शाकंभरी, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली, श्री दुर्गामाता, श्री महासरस्वती, श्री जोगेश्वरी, श्री सप्तश्रृंगी या देवीच्या मुर्त्या आहेत. या मंदिरातील मुर्ती तसेच पादुका मुळ स्थानातून अधिकारी व्यक्तीकडून संस्कारित करून आणलेल्या आहेत. कालीका मातेची पादुका व उत्सव मुर्ती रामकृष्ण परमहंसाचे सातव्या पिढीतील वंशज (देवू) चटर्जी यांचेकडून संस्करित करून आणल्या आहेत. याचप्रमाणे अष्टकुलदेवीच्या मुर्त्या अधिकारी व्यक्तिकडूनच विधिवत देजीत संस्करित करून आणल्या आहेत.
कुलदेवीच्या मुळस्थानाला ज्या भक्तांना नवरात्रीत जाणे अशक्य होते ते येथे येतात, येथे आल्यावर त्यांना मुळ स्थानी जाऊन आल्याचे समाधान मिळते, येथे भक्तजणांना योग्य ते आध्यात्मिक मार्गदर्शन देणेकरता आदरणीय श्री. गुरुवर्य फडणीस सर तत्पर असतात. आसपासच्या राज्यातील, गावातील भक्तांची येथे मोठी गर्दी असते. या परिसरातच राजस्थानी लाल दगडाचे अत्यंत कोरीव व देखणे असे श्री गणपती व श्री महादेवाचे मंदिर आहे.
येथील अखंड प्रज्वलीत धुनी ही महत्वपुर्ण आहे. गुरुचरित्रातील सर्व • ठिकाणातील विभुतींचा येथे समावेश आहे. या व्यतिरिक्त श्री दत्तगुरूंचा अघोर अवतार जो काशीच्या अघोर आश्रमात आहे, तेथील यज्ञ कुंडातील विभुती ही या ठिकाणच्या अखंड धुनीत आहे.
येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. वर्षभर याठिकाणी अनेक
पंथातील साधुसंत येवून देवी-देवतांची आराधना करतात.
नवरात्र उत्सवात या ठिकाणी सकाळी व सायंकाळी आरती तसेच भक्त मंडळीस नवचंडी यज्ञाचा लाभ घेता येतो. याठिकाणचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे येथे बळी दिला जात नाही. त्याऐवजी शारदीय नवरात्र उत्सवात भक्त मंडळीचे रक्तदान शिबीर आयोजित करून रूग्णांना जीवदान देवून पुण्य कमवा अशी भावना या अवधीत निर्माण केली जाते. शारदीय उत्सवात रक्तदान शिबिराची कल्पना व चर्चा भक्तजनांमधे वर्षभर चालू असून या उपक्रमांना अनोखे महत्व प्राप्त झाले आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद