
आठवणीतले “नाना”- भाग एक
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज
व्यक्तीच्या जीवन प्रवासातील प्रत्येक वळणावर अनेक जण येतात अनं जातात, कोणी चांगले अनुभव देतं, कोणाकडून काहीतरी शिकावयास मिळतं तर एखादं नातं मनाच्या अंतरंगात खोलवर कायमची जागा मिळवून जातं.आपल्या आयुष्यातून झालेली त्याची एक्झिट मनाला चटका देणारी ठरते,खोलवर जखम करून जाते अनं आयुष्यातील तो कोपरा कधीही भरून न येण्याजोगा कायमस्वरूपी रिताच राहतो. माझ्याही आयुष्यात ओघाने जवळ आलेले मध्यम उंची,सुदृढ बांधा, पांढराशुभ्र लेंगा-नेहरू शर्ट व गांधी टोपी असा पेहराव असणारे टुमदार व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांना परिचित असलेले “नाना”. शेतीसोबत ट्रक ड्रायव्हरची नोकरी करत मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईतून पत्नी,चार मुली व एक मुलगा अशा मोठ्या कुटुंबाचा डोलारा नानांनी समर्थपणे चालवला. आपल्या मुलांवर योग्य संस्कार करून मुलींची इच्छित स्थळी लग्नं लावून देणं त्याकाळी सोपी गोष्ट नव्हती.परंतु,हे शिवधनुष्य नानांनी लिलया पेललं. माझ्या अलीकडील काळातील सामाजिक जीवनातील प्रत्येक घटनांच्या साक्षीदारांपैकी एक म्हणजे कै श्री लक्ष्मण विठ्ठल बाकले उर्फ नाना होय.
क्रमशः

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद