आटपाडी येथे जायंटस् ग्रुपतर्फे जेष्ठ नागरिक,रक्तदान दिन व गदिमा जयंती साजरी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथे जायंटस् ग्रुप ऑफ आटपाडीच्या वतीने तांबडा मारुती मंदिर येथे जेष्ठ नागरिक दिन,रक्तदान दिन व ग.दि.माडगूळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्ष हैबतराव पावणे म्हणाले,ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाचे गाठोडे मोठे असते.ज्येष्ठ नागरिकांनी नकारात्मक भाव मनातून काढून टाकावा.आपल्या तरुणपणाच्या कारकीर्दित त्यांनी भरपूर कष्ट केलेले आहे. आता त्यांनी नामस्मरणात वेळ व्यतीत करावा.ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.आता आवश्यकतेच्या उलट क्रिया लोक करू लागल्यामुळे आरोग्याचे प्रश्न उद्भवले आहेत. ज्येष्ठांनी व्यायाम व आध्यात्मिक वाचन करावे.आपण एकमेकांचे मित्र होऊया. त्यामुळे सुखदुःख एकमेकांना सांगितले जातात.कमी बोला, गोड बोला, विचार करून बोला, जेणेकरून आपल्या बोलण्याचा परिणाम धारदार पिढीला बसणार नाही असे युक्तियुक्त जीवन जगा.वयस्कर मंडळीच्या आधाराची काठी आमचा जायंटस् ग्रुप होईल.
अर्थक्रांती जेष्ठ नागरिक जीवनगौरव अभियानचे आटपाडी तालुकाध्यक्ष व्ही.एन.देशमुख म्हणाले, माणसाला क्षणाक्षणाला अनंत अडचणी आहेत. आयुष्यभर खडतर प्रयत्न केले असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना उत्तरार्धात राग येणे स्वाभाविक आहे. ज्येष्ठांचे प्रश्न सोडवण्याचे काम ज्येष्ठ नागरिक संघटना करीत आहे. मन मोठे असेल तर वृद्धापकाळ आपणास त्रास देत नाही. ‘माणदेश’ या कविता गायनाने समारोप केला.
जायंटस् ग्रुप ऑफ आटपाडीचे अध्यक्ष हैबतराव पावणे यांनी प्रास्ताविक केले. युनिट ऑफिसर प्रदीप जाधव यांनी सुत्रसंचलन केले.
ज्येष्ठ नागरिक आण्णासाहेब भोरे,गोविंद काळे,सौ.गुलशन वंजारी,आनंदराव गायकवाड, तालुका उपाध्यक्ष भास्करराव गायकवाड, यादवराव ऐवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सदस्य अरविंद चांडवले यांनी आभार मानले.
यावेळी जायंटस् ग्रुपचे उपाध्यक्ष सतीश भिंगे,लक्ष्मणराव खटके, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब य.गायकवाड, विठ्ठलराव देशमुख,नंदकुमार राक्षे, बाळासाहेब भ.गायकवाड,हरी रावळ, शामराव जाधव, प्रकाश साळुंखे,रामचंद्र चव्हाण, हणमंत गायकवाड,श्रीरंग दबडे, मारुती देशमुख, बाळासाहेब ह.गायकवाड, पांडुरंग ऐवळे,विजया चांडवले,सुमन देशमुख,आदी उपस्थित होते.