
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
झरे
जगामध्ये अशिक्षित आणि खेड्यापाड्यातील माणसं आहेत. तोपर्यंत भाषा मरणार नाही….. डॉ. सयाजीराजे मोकाशी यांचे प्रतिपादन.
महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे. पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय, झरे. या महाविद्यालयामध्ये वाड्•मय उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनास उद्घाटक म्हणून मानदेशातील ख्यातनाम जेष्ठ साहित्यिक मा. प्राचार्य कला व वाणिज्य महाविद्यालय मायणी. हे उपस्थित होते. तर अध्यक्ष म्हणून संस्थेचे जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस. बी. माने उपस्थित होते उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना सयाजीराजे मोकाशी म्हणाले की,साहित्य म्हणजे समाजाचा समाज मनाचा आरसा आहे. असे सांगितले जाते पण त्याही पलीकडे साहित्य काहीतरी आणखी निदर्शनास आणते. आजची पिढी ही मोबाईल मध्ये दंग झाली असून त्यांनी मोबाईलचा वापर चांगल्या कारणासाठी करावा. आणि मोबाईल शिवाय दुसरेही जग आहे याचा पण विचार करायला हवा. साहित्य माणसाचा माणसाच्या आयुष्यात का महत्त्वाचा आहे तर साहित्य माणसाला अंतरबाह्य बदलून टाकण्याचे काम करते. जर निकोप साहित्य असेल तर माणसाच्या आयुष्याची जडण घडण चांगली होते. बऱ्याच वेळा आपली मराठी भाषा मरते की काय?असं बोललं जातं पण या जगामध्ये अशिक्षित आणि खेड्यापाड्यातील माणसं आहेत. तोपर्यंत भाषा मरणार नाही. साहित्य हे आनंदशिवाय जिद्, चिकाटी, प्रेरणा आणि पराक्रम शिकवते. साहित्यामुळे जीवनाकडे बघण्याची दृष्टी किंवा गांभीर्य माणसाला येते. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना एस. बी.माने म्हणाले की आपण साहित्य वाचून आपले जीवन जगण्यासाठी मार्ग सुकर करू शकतो किंवा चरित्र आत्मा चरित्र वाचून आपले मनोबल उंचावले जाते आणि त्या उंचावलेल्या मनोबलाचा आयुष्य जगण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो. या कार्यक्रमासाठी प्रा. खांडेकर एम.डी प्रा. पाटील एन. डी प्रा. शिंगाडे एम.एस. प्रा. माया घुटुकडे प्रा. चोपडे के. एस. विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. रेश्मा काळेल यांनी केले. प्रास्ताविक प्राध्यापक खिलारी व्ही. ए. केले तर आभार मुलाणी एसडी यांनी मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद