तुकाराम कोडलकर यांचे दुःखद निधन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील तुकाराम विठोबा कोडलकर यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले.
ते राजेवाडी गावचे ज्येष्ठ नेते तसेच आटपाडी तालुक्यातील राजकारण व समाजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते.गेल्या काही दिवसांपासून ते मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते.आटपाडी येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. हृदयविकाराच्या झटक्याने आज मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. राजेवाडी येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवार दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता राजेवाडी येथे रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,मुली नातवंडे, वगैरे परिवार आहे.