धनगर आरक्षण संदर्भात जतमध्ये धरणे आंदोलन , घोषणांनी तहसील कार्यालय दणाणले

तारांकीत प्रश्न मांडण्याची आ.सांवत यांनी दिली ग्वाही
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जत तालुका धनगर समाजाच्या वतीने जत तहसील कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे यांना निवेदन देण्यात आले .धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठक घेऊन ठोस भूमिका जाहीर करण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी आंदोलनात बोलताना केली.
महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे आश्वासन दिले होते पण त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याने महाराष्ट्रातील धनगर समाजामध्ये रोष आहे.जत तालुक्यातील धनगर समाज बांधव जत तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करून धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन ठोस भूमिका जाहीर करावी या मागणीकडे राज्य सरकारचे आणि विरोधी पक्षाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केलं आहे. असल्याचे ढोणे म्हणाले.
सरदार पाटील म्हणाले धनगर समाजाला सर्वच पक्षांनी फसविले आहे आता युवकांनी जागरूक होऊन आरक्षण चळवळ उभारली पाहिजे.
शंकर वगरे म्हणाले पुढील काळात महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल.
बंटी दुधाळ म्हणाले समाज्याच्या माथी फसव्या योजना मारल्या जात आहेत. समाजाला योजना नको हक्काचे आरक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले.
आमदार विक्रम सावंत यांनी आंदोलनास भेट देऊन येणाऱ्या अधिवेशनात धनगर समाजाचा तारांकीत प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मार्केट कमिटी संचालक बिराजी शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य आकाराम मासाळ,दिलीप वाघमोडे, नाथा पाटील, नगरसेवक निलेश बामणे, किसन टेंगले, प्रतापूरचे सरपंच तुकाराम उपसरपंच बाळासाहेब खांडेकर, मुचंडीचे सरपंच रमेश देवर्षी, बिरनाळचे उपसरपंच योगेश एडके, कंटीचे उपसरपंच रवि पाटील, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी पडोळकर, सागर शिनगारे, मुरलीधर शिंगे , पोपट पुकळे,उत्तम म्हारनुर,रमेश कोळेकर, विलास काळे, पिंटू व्हणमाने,प्रकाश व्हणमाने,संतोष मोटे,अनिल मिसाळ तानाजी कटरे, दीपक मोटे, योगेश व्हणमाने, समाधान वाघमोडे राहुल तुराई,केरबा फोंडे, रवी कित्तूरे,राहुल बंडगर, सुरेश हाके ओंकार बंडगर ,अण्णा टेंगले यासह तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.