जायंटस् ग्रुपतर्फे निंबवडे येथे वृक्षारोपण

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
जायंटस् ग्रुप ऑफ आटपाडी यांच्या वतीने निंबवडे येथे डॉ. विनय पत्की यांच्या शेतामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रुपचे तालुक्यातील अनेक सदस्य उपस्थित होते.
जायंटस् ग्रुप ऑफ आटपाडी यांच्यावतीने तालुक्यात विविध सामाजिक, आरोग्य विषयक, शैक्षणिक, पर्यावरण पूरक असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. ग्रुपचे तालुका अध्यक्ष हैबतराव पावणे यांच्या नेतृत्वाखाली बी ओ डी सदस्य विनय पत्की यांच्या निंबवडे येथील शेतामध्ये रविवारी सकाळी नारळ,चिकू,मोसंबी आदिंचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष हैबतराव पावणे ,उपाध्यक्ष सतीश भिंगे,डॉ.विनय पत्की,लक्ष्मण चोथे, माजी अध्यक्ष डॉ.एम.वाय.पाटील, युनिट ऑफिसर प्रदीप जाधव, डॉ. सचिन कुलकर्णी,सदस्य अरविंद चांडवले,लक्ष्मणराव खटके, सुदाम देशमुख,कृषी सहाय्यक रविंद्र घुटुकडे, डॉक्टर बी.टी.पिंजारी,सचिन पुजारी, प्राथमिक शिक्षक मलमे व खताळ,आदी पदाधिकारी व सदस्य यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.