माणगंगा नदीपुलावरील अपघातात मोटारसायकलस्वार ठार

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड

म्हसवड गावच्या हद्दीत सातारा ते पंढरपूर रस्त्यावर असलेल्या माणगंगा नदीवरील पुलाच्यालगत असलेल्या फूटपाथवर विशाल वस्ताद दोलताडे (वय २६ वर्ष, रा.भाटकी ता. माण जि. सातारा) हा युवक रात्री साडे आकरा वाजणेच्या दरम्यान मोटरसायकल वरून घरी येत असताना पुलावरील फुटपाथवर जोरात धडकून पडल्यामुळे गंभीर जखमी होऊन जागेवरच मयत झाला.


या अपघाताबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी,
विशाल वस्ताद दोलताडे हा दि १८/८/ २३ रोजी रात्री साडे आकरा वाजणेच्या दरम्यान आपल्या हिरोहोंडा मोटार सायकल (क्रमांक एम एच 13 सी इ 7261) वरून घरी जात असताना अपघात होऊन गंभीर जखमी झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

याबाबतची फिर्याद चुलत भाऊ इतिहास काशिलिंग दोलताडे (वय – 26 वर्षे रा. रांजणी ता.फलटण जि.सातारा) याने म्हसवड पोलीस ठाण्यात दिली.त्यानुसार अपघाताची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सपोनि राजकुमार भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव करत आहेत.