बेडग येथे शेत तळ्यात पडून 3 वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
बेडग

बेडग ता. मिरज काल दिनांक 19 रोजी शेतातील घरासमोरील शेततळ्यात बुडून एका तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
प्रीतम कृष्णा खाडे वय वर्षे तीन या बालकाचा घरासमोरील शेततळ्यात पडून मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घरचे सगळे कामात व्यस्त असताना प्रीतम हा खेळत शेततळ्याकडे गेला व शेततळ्याची उंची कमी असल्यामुळे तो तळ्यामध्ये पडला
बराच वेळ झाला तरी प्रीतम कुठेच दिसेना म्हटल्यावर प्रीतमला आजूबाजूला शोधू लागले वडील कृष्णा यांनी शेततळ्याकडे पाहिले यावेळी प्रीतम त्यांना पाण्यामध्ये दिसला पाण्यातून बाहेर काढून त्याला तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान प्रीतमचा मृत्यू झाला या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला झाली आहे