
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथे पंचायत समितीच्या पाठीमागील बाजूस भागवत नगर भागात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरी फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की,आटपाडी पंचायत समितीच्या पाठीमागील बाजूस प्रा. प्रवीण भास्कर भांबुरे यांचे घराचे दक्षिणेकडील बाजूचे शटरच्या दरवाज्याचे कडी अटकवण्याचा भाग तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील सुमारे सोने 11 ते 12 तोळे सोने तसेच सुमारे सव्वा लाख रुपयांची रोख रक्कम चोरल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच त्यांच्याच जवळपास अन्य एका ठिकाणी चोरी केल्याचेही वृत्त आहे. त्याचबरोबर आणखी एक बॅग आणून तिच्यामध्ये असणारे साहित्य विस्कटले आहे. घटनास्थळी आटपाडी पोलिसांनी भेट दिली आहे.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या