राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले

पूरस्थितीचा धोका वाढणार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
बरगेवाडी

धुवाधार पावसामुळे बुधवार दिनांक 27 रोजी
सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी पूर्ण क्षमतेने धरण भरले. राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापुराचा धोका कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने आज सकाळी राधानगरी धरणाचे ५ स्वयंचलीत दरवाजे उघडले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसापासून पाऊस कमी आहे. तरीही धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरण आज सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले. धरणाचे ५ स्वयंचलीत दरवाजे उघडले. आज सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी पूर्ण क्षमतेने धरण भरले. यानंतर ८ वाजून ४० मिनिटांनी धरणाचा ५ आणि ६ नंबरचा असे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यानंतर अवघ्या तासाभरात आणखी दोन दरवाजे उघडल्याने धरणाच्या स्वयंचलित ३, ४, ५ आणि ६ अशा एकूण ४ दरवाज्यातून विसर्ग सुरू होता तर तर दुपारी १ वाजून २३ मिनिटांनी ७ क्रमांकाचा दरवाजा खुला झाला आहे. यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. पाच स्वयंचलित दरवाजे व पॉवर हाऊस मधून ८५४० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे राधानगरी उपविभागीय अधिकारी माननीय सुशांत बनसोडे यांनी आवळी बुद्रुक गावातील परिस्थितीची पाहणी केली यावेळी नदी शेजारी ग्रामस्थांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी सरपंच सौ अस्मिता सुतार, ग्रामसेवक सुरेश ढेरे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते