जतमध्ये मोहरमनिमित्त पोलीसांचा रुट मार्च

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जतचे पोलीस निरीक्षक राजेश रामागरे यांच्या मार्गदर्शनाखाली जत पोलिसांनी जत शहरातुन रुट मार्च काढला. शिवाजी पेठ, चिनगी बाबा मंदिर रोड, लोखंडी पूल, गांधी चौक बनाळी चौक, महाराणा प्रताप चौक, सोलनकर चौक, मार्गे पो लीस ठाण्यापर्यंत रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश रामागरे, पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड,राजश्री गायकवाड, पोलीस हवालदार श्रीशैल वळसंगकर, शरद हिप्परकर निवृत्ती मुंजे, रुपेश भडके, अमोल चव्हाण, खरात, चौगुले यांच्यासह पोलीस व महिला पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक राजेश रामागरे म्हणाले की, मोहरम सन शांततेत साजरा करा कोणालाही त्रास होता कामा नये सार्वजनिक शांतता भंग होऊ नये असे कोणतेही कृत्य करू नये असे आव्हान पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी केले.