
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
चौंडी/जामखेड
अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामकरण अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथे केली.
अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्म गावी चौंडी येथे ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री प्रा.राम शिंदे, अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह मान्यवर व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सरकार समाजाच्या मागण्याबाबत ज्या बाबी करता येतील त्या करण्यासाठी अनुकूल आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय बारामती असे सरकारने नामकरण करावे अशी या कार्यक्रमात मागणी केली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने हे मागणी मान्य करून बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण याच सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आभारापूर्वी जाहीर केले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामकरणास अनुमोदन देऊन आभार मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद