कळंत्रेवाडी,नाणेगाव परिसरात अल्पवयीन चोरट्याचा वावर

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज

कळंत्रेवाडी,नाणेगाव(पुनर्वसन),ता.कराड परिसरात गत चार दिवसांपासून अल्पवयीन चोरट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत. याबाबत नागरिकांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार,दोन दिवसांपूर्वी नाणेगाव(पुनर्वसन) येथे सदर अल्पवयीन चोरट्याने रोख रकमेवर हात मारून धूम ठोकल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. दरम्यान,कळंत्रेवाडी येथील रहिवासी श्री आनंदराव येळवे यांच्या घराचे बांधकाम सध्या सुरू आहे. नाणेगाव(पुनर्वसन)येथील केलेली चोरी पचल्याचा अंदाज आल्यानंतर येळवे यांच्या बांधकाम साइटवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्याच्या भिंतीला अडकवलेल्या शर्टच्या खिशातून दोनशे रुपये चोरून सदर अल्पवयीन चोरट्याने पोबारा केल्याची माहिती येळवे कुटुंबियांनी दिली आहे. भरदिवसा लागोपाठ झालेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर नाणेगाव तसेच कळंत्रेवाडी परिसरात भितीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी भीती न बाळगता अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.