
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज
उंब्रज,ता.कराड येथील नागरिक व उंब्रज पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोटरसायकल चोरटा जेरबंद करण्यात उंब्रज पोलिसांना यश मिळाले असून ६०,०००/- रुपयांचा मुद्देमाल उंब्रज पोलिसांनी चोरट्यासह ताब्यात घेतला आहे. याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,शनिवार दिनांक २३जून रोजी उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, कॉन्स्टेबल निलेश पवार,श्रीधर माने, साळे हे उंब्रज गावामध्ये पेट्रोलिंग करत असताना गावातील अभिजीत घाडगे, दीपक घाडगे,यश घाडगे,कृष्णत चव्हाण या नागरिकांनी उंब्रज गावच्या हद्दीत अंधारवाडी रोडवर हनुमान मंदिराजवळ एक चोरी करणारा चोर पकडला आहे.अशी उंब्रज पोलीस स्टेशनला फोनवरून माहिती दिली. त्यानंतर तात्काळ पेट्रोलिंग करणारे अधिकारी व पोलिस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्यास रंगेहात पकडून त्यास उंब्रज पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याची चौकशी केली. संशयिताचे दिनकर शामराव साळुंखे(वय-३०) राहणार येराड,ता.पाटण असे नाव आहे. चौकशीत त्याने शिवडे,ता.कराड गावच्या हद्दीतील स्वराज टेलर्स फेब्रिकेशनचे दुकानच्या बाहेर पडलेले लोखंडी अँगल चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.तसेच त्याच्या ताब्यातील मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली असून सदरची मोटरसायकल कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याने चोरली असल्याची कबुली चौकशीत दिली आहे. दरम्यान, उंब्रज पोलिसांनी संशयित दिनकर साळुंखे यास पुढील कार्यवाहीसाठी कराड शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. याबाबतची माहिती आज उंब्रज पोलिसांकडून देण्यात आली आहे. मोटरसायकल चोरटा पकडल्याने जागरूक नागरिकांचे कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या