
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील एका खाजगी नोकरी करीत असलेल्या २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी सुनील मोहन शिंदे रा. जुना कराड नाका, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर याचेविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मार्च २०२३ ते २० जुलै,२०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या दरम्यान संशयित आरोपी सुनील शिंदे यांने या तरुणीस ‘तुला जर तुझ्या घरच्यांना खुश बघायचे असेल, तुझ्या बहिणीला सुखात बघायचे असेल, तर मी म्हणेल तसे वागावे लागेल.’ अशी धमकी देऊन तिची इच्छा नसतानाही तिला फोनवर बोलायला भाग पाडले व तिने त्याचा फोन उचलायचा बंद केल्यावर तरुणीच्या घरासमोर येऊन तिच्या हाताला धरून मिठी मारण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘तुला दाखवतोच’ अशी धमकी दिली. त्यामुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अशा स्वरूपाची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तरुणीने दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एस.जे.मिसाळ करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या