

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा रविवार दिनांक ०२जुलै २०२३ रोजी भीषण अपघात झाला असून. नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या होंडाई वरना कारचा अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गाडी डिव्हायडरला धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात हुंडाई वरना गाडी क्रमांक MH-04JV-2430 ह्या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मृतांमध्ये पती-पत्नी व मुलाचा समावेश आहे. मृतांची नाव मोहम्मद जावेद अख्तर मोहम्मद सलिमोद्दिन अख्तर- वय ५५,अरकुमुद्दीन जावेद अख्तर वय २३,शामीमबेगम मोहम्मद जावेद अख्तर वय ४५ सर्व सध्या राहणार मुंब्रा मुंबई व मुळगाव हैदरबाग मस्जित जवळ देगलूर नाका नांदेड तालुका जिल्हा नांदेड हे बकरी ईद चा सण साजरा करून नांदेड वरून मुंबईकडे जात असतांना गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं सदर गाडी महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हायडरला जाऊन धडकल्यामुळे सदर डिवाइडर हे सिमेंट काँक्रीटचे असून देखील ते तुटले तसेच गाडीचा समोरील भाग पूर्णपणे दाबून गेला आहे हा अपघात साधारण ११.३० वाजेच्या सुमारास भोजडे शिवार समृद्धी पुलावर समृद्धी महामार्गावरील १२ चारी येथे घडली आहे या अपघातामध्ये गाडीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, बुलढाणा बस अपघाताची घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा कोपरगाव हद्दीत पुन्हा समृद्धी महामार्गावर अपघात घडल्याने रस्ते अपघात आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.याच आठवड्यात तीन घटना यासमृद्धी महामार्गावर होऊन दोन अपघातात ०६ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती कळताच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले त्यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुसारे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र म्हस्के पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख ड्रायव्हर सागर साळुंखे यांच्या सह पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहचून घटनास्थळाची माहिती घेतली सदर घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या तीनही व्यक्तींचे मृतदेह समृद्धी महामार्गाच्या ॲम्बुलन्स मधून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टरांनी सदर व्यक्तींची तपासणी करून तिघांनाही मयत घोषित केले असून याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला ३३८/२०२३ भादवि कलम ३०४ (अ) २७९,४२७ मोटार व्हिकल कायदा कलम १८४ १८७ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे सदर घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहे.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या