गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त माडगूळेमध्ये विविध कार्यक्रम

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे
तथागत् भगवान गौतम बुद्ध , भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी संयुक्त जयंती महोत्सव माडगूळे येथे शुक्रवार दिनांक५/५/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे , या संयुक्त जयंती निमित्त माडगूळे येथे बुधवार दिनांक ३/५/२०२३ रोजी रात्री ८:००वाजता “आवाज भिमाचा” गायन पार्टी नेलकरंजी यांच्या भीम गीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमास सौजन्य प्रतीक्षा कॉन्ट्रॅक्शनचे हनुमंत बाबुराव झोडगे यांचे आहे तर गुरुवार दिनांक ४/५/२०२३ रोजी भव्य रेकॉर्ड डान्स खुलागट स्पर्धा आयोजित केली आहे यात ग्रुप डान्स मध्ये १)प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये१०,०००/- चे माडगुळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री संजय दत्तात्रय विभुते यांचे वतीने२) द्वितीय क्रमांक चे ७०००/- हजार रुपयाचे रोख बक्षीस भारती कॉन्ट्रक्शन चे चैतन्य बापूसाहेब विभुते यांचे वतीने३) तृतीय क्रमांकाचे ५०००/- चे बक्षीस माडगुळे विकास सोसायटीचे चेअरमन सोमनाथ गंगाराम विभुते व विभुते कृषी सेवा केंद्राचे सतीश प्रभाकर विभुते यांच्या वतीने तर सोलो डान्स स्पर्धेचे प्रथम क्रमांकचे बक्षीस ४००१/- चे आशा कॉन्ट्रक्शनचे प्रशांत अनिल झोडगे, द्वितीय क्रमांकाचे ३००१/- चे बक्षीस विद्याधर मनोहर मोरे यांचे वतीने ,तृतीय क्रमांकाचे २००१/- चे निशांत नानासो चंदनशिवे यांचे वतीने ठेवण्यात आले आहे या स्पर्धेसाठी प्रवेश फी२००/-व१००/- ठेवण्यात आली आहे , दिनांक ५/५/२०२३ रोजी दुपारी ३ वाजता मा ,श्री गोपीचंद पडळकर (आमदार विधान परिषद) मा, श्री अमरसिंह (बापू) देशमुख (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष) मा, श्री अनिल शेठ पाटील (चेअरमन सिद्धिविनायक उद्योग समूह आटपाडी) मा, श्री राजेंद्र खरात (सांगली जिल्हा आरपीआय अध्यक्ष )या प्रमुख मान्यवराच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचबरोबर सौ संगीताताई विठ्ठल गवळी (सरपंच ग्रामपंचायत माडगुळे) विशाल बापूराव झोडगे (डेप्युटी सरपंच माडगुळे) डी के मोरे (ग्रामसेवक माडगुळे) दत्तात्रय बालसिंग वाघमारे (पोलीस पाटील माडगुळे) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे व संध्याकाळी ६:०० वाजल्यापासून तथागत् भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी या सर्व कार्यक्रमास माडगुळे व माडगुळे पंचक्रोशीतील तमाम रसिक बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आव्हान बौद्ध विकास मंडळ माडगुळे( मुंबई) यांनी केले आहे.