आटपाडी येथे शेतामध्ये वीज पडून 1 लाख 10 हजारांचे नुकसान

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथील पुजारवाडी येथील जगन्नाथ विठोबा पुजारी या शेतकऱ्याच्या शेतात वीज पडून तब्बल १ लाख १० हजारांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार येथे डाळिंब व टोमॅटो बागेतील ठिबक पाईप संच लिंबाच्या सावलीला ठेवलेला होता त्याच लिंबाच्या झाडावर वीज पडल्यामुळे खाली असलेल्या ठिबकचे नुकसान झाले.