रुपाली जाधव-सुर्वे कमांडर गाडीतून उडून बाहेर पडल्याने डोक्याला जबर मार
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील बसरर्गी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या रूपाली तानाजी जाधव -सुर्वे वय ३५ (दुधाळवस्ती जत)यांचे अपघाती निधन झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की रूपाली जाधव आरोग्य सेविका म्हणून बसर्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या. नेहमीप्रमाणे सोमवारी ड्युटी संपल्यानंतर त्या खासगी वाहनाने जतकडे निघाल्या होत्या.
बिळूर- बसरगी मार्गावर कमांडर गाडीच्या आडवे रिक्षा आल्याने गाडी चालकाने ब्रेक दाबले. यामध्ये कमांडर गाडीमध्ये बसलेल्या आरोग्यसेविका रूपाली जाधव बाहेर उडून पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच ठार झाल्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा आहे अधिक तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या