
गजाने(मेखेने) फोडले डोळे,कुऱ्हाडीने डोक्याचा केला चेंदामेंदा,खांडके
बानगे ता.कागल येथील घटना
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कागल
बानगे (ता. कागल) येथील मेंढपाळ मारुती मायाप्पा धनगर (वय २८) यांचा त्याच्याकडेच बकरी चारण्यासाठी असणाऱ्या दोघा कामगारांकडून गज (मेख) आणि कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला. पगार वेळेत न दिल्याने हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संदीप दादासो माळी (वय ३६, रा.नांदणी ता.शिरोळ) व रविकिरण चैनय्या ( वय २४ रा. बेळगांव) या दोघांना कागल पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे,तर मेंढपाळ समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,मारुती धनगर यांच्या मेंढ्या बानगे गावच्या पश्चिमेला असणाऱ्या भटकी नावाच्या शेतात बसायला होत्या. माळी व चैनय्या हे अनेक दिवसांपासून मारुती धनगर यांच्याकडे रोजगारी म्हणून काम करत होते. मात्र अनेक दिवसांपासून पगार न दिल्याच्या रागातून या दोघांनी शुक्रवारी रात्री मारुती हे झोपेत असताना संदीप व रविकिरण यांनी त्याच्यावर लोखंडी गज व कुऱ्हाडीने जोरदार वार केले. हे दोघेही दिवसभर दारुच्याच नशेत होते. त्यांनी शेजारच्या ऊसात हा मृतदेह टाकला होता.

दरम्यान, मारुती धनगर यांच्या पत्नी बाळंतपणामुळे घरीच असतात. काल शनिवारी मारुती हे सकाळी बकऱ्यातून घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोधाशोध सुरू केला. यावेळी या दोघा कामगारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शनिवारी सायंकाळी त्यांचे चुलत बंधू सिध्दू रामा धनगर यांना मृतदेह आढळून आला.
घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, कागलचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे, महिला पोलिस उपनिरीक्षक मोनिका खडके, विजय पाटील यांनी धाव घेऊन राञी उशिरा पंचनामा केला. अधिक तपास मोनिका खडके या करत आहेत.
यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने मेंढपाळांना आवाहन
नुकतेच बानगे ता. कागल येथे एका मेंढपाळाचा बांधवाचा त्याच्याकडे असलेल्या कामगारांनी खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेच्या अनुषंगाने संघटनेच्यावतीने मी सर्व मेंढपाळ बांधवांना विनंती करतो की, त्यांनी आपल्याकडे कामगार ठेवत असताना त्याची शहानिशा करावी. कामगार हे गुन्हेगारही असू शकतात. एखादा गुन्हेगार आपल्या घरात भाड्याने राहत असेल आणि त्याची एखादी घटना उघडकीला आली तर त्या गुन्ह्यात तो राहत असलेल्या घरमालकाला देखील सहभागी करून घेण्याची प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. तसेच प्रकार मेंढपाळ बांधवांनी ठेवलेल्या कामगाराकडून घडल्यास मालक देखील त्यांच्या गुन्ह्यात सहभागी केला जाऊ शकतो व त्यामुळे मेंढपाळ बांधवांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी यशवंत क्रांती संघटनेच्यावतीने मी (संजय वाघमोडे संस्थापक अध्यक्ष) बांधवांना विनंती करतो की आपल्याकडे असलेले कामगार ही गुन्हेगार नाहीत याची खात्री करूनच कामावर ठेवावेत. कामावर ठेवल्यास त्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड फोटो, इत्यादी आवश्यक कागदपत्रे पहावीत. किंवा कागद पत्रांच्या झेरॉक्स प्रती जवळ ठेवाव्यात व पोलीस ठाण्यात माहिती देऊन ठेवावी.. म्हणजे अशा घटना टाळण्यासाठी मदत होईल..

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या