
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील कौठुळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड, आटपाडी शाखेचे शाखाधिकारी सुभाष पाटील यांचा आज सायंकाळी दिघंची-आटपाडी मार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
घटनेबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की,आटपाडी-दिघंची महामार्गावर घराकडे वळण्याच्या महामार्गावरील ठिकाणाजवळ त्यांना मोटरसायकलने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. आटपाडी येथे उपचारासाठी आणताना त्यांचा मृत्यू झाला.
सुभाष पाटील हे कौठुळी ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून कार्यरत होते. तसेच ते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड, आटपाडी शाखेमध्ये शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजेवाडी, खरसुंडी, घरनिकी, शेटफळे या शाखेमध्ये सेवा बजावली होती. सध्या ते जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये श्रेणी दोन ( द्वितीय श्रेणी) दर्जाचे अधिकारी होते. तसेच बँकेच्या कर्मचारी संघटनेचे ते जिल्हा स्तरावरीय संचालक म्हणून कार्यरत होते.
अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे बँकेचे सेवक-अधिकारी असल्यामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. बँकेमध्ये सेवा बजावत असताना तसेच मित्र परिवारामध्ये अडीअडचणीच्या लोकांना त्यांनी दिलदारपणे व निस्वार्थपणे मदत केली.अपघाताची बातमी समजताच आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ मित्रपरिवाराने गर्दी केली. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या