माडगुळे येथील अक्षय विभुते यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत परदेशी शिष्यवृत्तीचे वितरण
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्यामार्फत देण्यात येणारी परदेशी शिष्यवृत्ती माडगुळे येथील चंद्रकांत विभुते यांचे अमेरिका येथे एम एस करणारे सुपुत्र अक्षय चंद्रकांत विभुते यांना प्रदान करण्यात आली.
कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे व सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे हा सोहळा संपन्न झाला.ही शिष्यवृत्ती चंद्रकांत विभुते व भारत विभुते यांनी सांगली येथे स्वीकारली.