

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथे जी चॅम्प अबॅकस अँड ब्रेन जिमचे उद्घाटन आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी मैनाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा.हेमंत कुलकर्णी,प्रा.सौ.ऋतुजा कुलकर्णी, अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सल्लागार अरविंद चांडवले, कवी सुखदेव नवले, प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके,सौ.व श्री.गरकल,सौ.काळेल,सौ.इनामदार,सौ.शोभा नवले आदि उपस्थित होते.
एकाग्रता,कल्पनाशक्ती, अचूकता, श्रवणशक्ती, स्वावलंबन, रचनात्मकता, स्मरणशक्ती, सादरीकर, गती, आकलनशक्ती हे गुण विकसित करण्यासाठी या क्लासचा उपयोग होणार असून नवीन बॅचसाठी प्रवेश सुरू करण्यात आला आहे.४ ते १५ वर्षे वयोगटासाठी हा क्लास असून एका बॅचमध्ये फक्त पंधरा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती सौ.मिना नवले व प्रमोद नवले यांनी दिली.आटपाडी येथे इंडेन गॅसशेजारी स्वप्नपूर्ती निवास येथे हे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद