
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यात शेटफळे, आटपाडी येथे वेगवेगळ्या तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. वेगवेगळ्या तीन ठिकाणाहून मोटरसायकल,पाण्यातील विद्युत पंप व कृषीपूरक साहित्याची चोरी झाली आहे.
शेटफळे येथील सतीश आण्णासो गायकवाड यांच्या शेतामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले 416 किलो वजनाचे शेडनेट, सिंटेक्स टाकी, ग्रास कटर मशीन व बागेमध्ये लागणारी लिक्विड खताची दोन पोती अशा एकूण 58 हजार रुपयांच्या वस्तू अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोरवी करीत आहेत.
आवळाघ येथील राजेंद्र किसन हेगडे यांची आटपाडी गावातील ओढ्यावरील पुलालगत ठेवलेली हिरो होंडा डिलक्स कंपनीची मोटर सायकल (एम एच४२सी ७४९७) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आवळे करीत आहेत.
शेटफळे येथील भारत मारुती माने यांची शेटफळे गावातील ओढ्यातून पाण्यातील इलेक्ट्रिक मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल माने करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या