
जत तालुक्यातील कुणीकोनूर येथील ही घटना
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील कुणीकोणूरमध्ये संशयावरून पत्नी व १४ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडीस आला आहे.या घटनेने जत तालुक्यात एकच खळबळ उडाली.
जतच्या दक्षिण भागातील कुणीकोणूर ते सनमडी रोडवर असलेल्या बेळंखी वस्ती येथे ही ह्रदयद्रावक घटना घडली.पतीनेच खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांकडून वर्तवला जात आहे.आई प्रियंका बिराप्पा बेंळुखी (वय-३२) व मुलगी मोहीणी बिराप्पा बेंळुखी (१४) असे मृत मायलेकीची नावे आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या