
सोने व रोख रक्कम असा १ लाख,२८ हजार रुपयांचा ऐवज लंपास
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडीनजीक गोंदिरा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १ लाख,२८ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना रात्री घडली. याप्रकरणी बाबुराव नाना मेटकरी यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की,शेटफळे रोड, गोंदिरा, आटपाडी ता. आटपाडी येथील बाबुराव नाना मेटकरी यांच्या घरी दि.१८ एप्रिल रोजी रात्री अकरा ते १९ एप्रिल रोजीच्या पहाटे पाच वाजण्याच्या वेळेला चोरी झाली. यामध्ये एक तोळ्याच्या सोन्याच्या दोन बोरमाळी, एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याचे सोन्याची बोरमाळ, एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याचे कानातील सोन्याचे वेल दोन जोड, एक तोळ्याचे कानातील फुले दोन जोड व ३८ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे.
हे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असे घरामधील तीन पत्र्याच्या पेट्यांमध्ये ठेवले असताना अज्ञात व्यक्तीने घराच्या पाठीमागील दरवाज्याची आतील कडी काढून घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या