
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील येळवी येथील औदुंबर विजय जगताप यांने स्वत:च्या वॉट्सअप स्टेटसला भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत शेतातील घरी गळफास घेऊन भावपूर्ण श्रद्धांजलीची सोशल मिडियावर पोस्ट टाकून गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
शुक्रवारी दि.14 एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास औदुंबर जगताप वय २२ याने स्वतःच्या व्हॉट्सअँप स्टेटलला स्वतःचा फोटो ठेवला. स्टेटस ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या