प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथील सोळा वर्षीय योगेश्वरी मुरलीधर बागुल हिने दि.७ रोजी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की,आटपाडी एस.टी.बस आगारात मुरलीधर बागुल हेल्पर म्हणून सेवा/नोकरी करीत आहेत.ते सुरेश इंडेन गॅसच्या शेजारी भाड्याच्या खोलीत आपल्या कुटुंबासोबत राहतात.दि.७ रोजी सायं. ६ वाजण्याच्या दरम्यान घरी कोणीही नसताना योगेश्वरी हिने साडीने गळफास घेतला. हे घरातील लोकांच्या लक्षात येताच तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु तिचा मृत्यू झाला होता.तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या