आटपाडी येथील सुशांत हॉटेलमधून मोटरसायकल व रोख रक्कमेची चोरी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथील सुशांत मोहन गेळे यांच्या सुशांत हॉटेल येथे कामास असलेल्या कामगाराने मोटरसायकल व रोख २ लाख ९६ हजार रुपये चोरुन नेल्याची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आटपाडी येथील आंबेवनमळा येथे सुशांत मोहन गेळे यांचे सुशांत हॉटेलमध्ये पूर्वी दत्तात्रय बाळासो गोडसे रा.महूद पवारवाडी ता. सांगोला जि. सोलापूर कामगार म्हणून कामास होता. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या काउंटरच्या ठिकाणी अडकवलेली मोटर सायकलची चावी घेऊन ती गाडी (एम एच १० डी के ६७५८) तसेच किचनमध्ये तांदळाच्या डब्यात ठेवलेले रक्कम रुपये दोन लाख 96 हजार चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद सुशांत गेळे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल गारळे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.