प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
मापटेमळा आटपाडी येथील सुशांत हणमंत गळवे या २१ वर्षे तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, आटपाडी येथील सुशांत हणमंत गळवे यांने आज सकाळी पावणे बारा वाजण्याच्या पूर्वी त्याच्या राहत्या घरी लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खोत करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या