
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील भानुदास चंदू मंडले याच्यावर देशी दारू विक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, २ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास बनपुरी ते खरसुंडी जाणाऱ्या रस्त्यावर जोतिबा मंदिराच्या दक्षिण भिंतीलगत असलेल्या मोकळ्या जागेमध्ये भानुदास चंदू मंडले (वय 53 वर्षे, रा. बनपुरी ता.आटपाडी जि. सांगली) याने बेकायदा विनापरवाना देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगली होती. थ्री एक्स कंपनीच्या ९० मिलिच्या २६ बाटल्या आढळून आल्या. त्याची ५० रुपयाप्रमाणे विक्री दराने १३०० रुपये किमतीच्या बाटल्या आढळल्या आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक अमोल विलास माने यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून पोलीस हवालदार पाटील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या