खून नव्हे, तरुणाचा अतिमद्य प्राशनाने मृत्यू!

जत शहरातील घटना
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जत जवळील अथणी रस्त्यालगत यल्लमा देवीच्या विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जत येथील मदने वस्तीवरील तरुण सचिन उर्फ शशिकांत बिरा मदने (वय ३२) याचा अती मद्य प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली आहे.सकाळपासून सोशल मीडियावर मदने याचा खून झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मात्र सांगली जिल्हा पोलिस मुख्यालयाने हा खून नसून अती मद्य प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद झाली असल्याचे म्हंटले आहे.
सांगली जिल्हा पोलिस मुख्यालयाने केलेल्या खुलाशात म्हंटले आहे की, 02/04/2023 रोजी जत पोलीस ठाणे हद्दीत यल्लमा परिसर जत या ठिकाणी खून झाले बाबत सगळी कडे अफवा पसरवली होती. परंतु सदरचा प्रकार तसा नसून मयत शशिकांत उर्फ सचिन बिरा मदने (वय 26 रा. यल्लमा परिसर,मदने वस्ती, जत) हा दारूचा व्यसनी होता. त्यास दारूचे व्यसन खूप होते, उत्तर तपासनी (पोस्ट मार्टम ) मध्ये त्याचा मृत्यू दारूचे अतिसेवन केलेने मयत झाला आहे. त्यास वन्य प्राणी यास चेहऱ्यावरवर खुरचटलेलं असलेने खून झालेची अफवा पसरली होती. परंतु तसा कोणताही प्रकार नाही. दारूच्या अतिसेवनाने मदने मयत झाले असले बाबत डॉक्टर यांनी सांगितलं आहे. त्या बाबत अकस्मात मयत नोंद झाली आहे.
सचिन उर्फ शशिकांत बिरा मदने हा व्यवसायाने ड्रायव्हर होता. तो यल्लामादेवी मंदीराजवळ मदने वस्ती येथे राहत होता. रात्री मदने हा आपल्या घरी नव्हता. त्यास दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात आले. पहाटे फिरायला जाणाऱ्या लोकांना त्याचा मृतदेह आढळला. यल्लमा देवीच्या विहिरीकडे जाणाऱ्या रोडवर विहिरी पासुन अलीकडे २०० मीटर अंतरावर ही घटना घडली आहे.
तो रात्रभर घरी नव्हता. नातेवाईकांनी शोध घेतला, मात्र सापडला नाही. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळला. पोलीसांनी पंचनामा करुन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर दारूच्या अतिसेवनाने मदने मयत झाले असले बाबत डॉक्टर यांनी सांगितलं आहे.