आटपाडी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील एका गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये पोस्को कायद्याच्या कलमासह गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपी मारुती गोविंद भोरे यास आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील एका गावामध्ये ३० मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपीने अल्पवयीन मुलगी व तिची बहीण दोन्ही समवेत असताना अल्पवयीन मुलीस ‘तुला खाऊ खायला पैसे देतो, माझा मुका घे’ असे म्हणून त्याची लघवीची जागा बाहेर काढून ‘हातात घे’ असे म्हणाला. त्यावेळी मुलगी घाबरून घराकडे येत असताना तिला धरून ‘हे कोणाला सांगितले तर तुला मारून टाकीन’ अशी धमकी दिली. तसेच घडलेल्या प्रकाराबद्दल संबंधित विचारणा करण्यास गेले असताना त्याने ‘…तुम्हाला काय करायचं आहे, ते करा’ असे म्हणाला. अशा स्वरूपाची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली असून भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चोरमले करीत आहेत.