‘एकच मिशन जुनी पेन्शन’ म्हणत आज १८ लाख कर्मचारी संपावर जाणार

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
मुंबई

आजपासून महाराष्ट्र राज्यातील 18 लाख कर्मचारी संपावर जाणार असून कामकाज बेमुदत ठप्प राहणार असल्याचा कर्मचारी संघटनांचा दावा आहे.नवीन पेन्शन योजना रद्द करणे, दीर्घ मुदतीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना समान वेतन देणे, रिक्त पदे तात्काळ भरणे,अनुकंपातत्ववरील नियुक्त करणे, सर्व भत्ते केंद्रासमान मंजूर करणे, निवृत्तीवय साठ करा, नवीन शिक्षण धोरण रद्द करा,कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करा, यासह अनेक मागण्यांमुळे आजपासून 18 लाख कर्मचारी संपावर जात आहेत. जो कळीचा मुद्दा आहे तो जुनी पेन्शन स्कीम! सरकारने मात्र संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात असल्याचे स्पष्ट केले आहे.
2004 मध्ये केंद्राने नवीन पेन्शन धोरण आणले. 2005 साली महाराष्ट्रातही लागू झाले. पूर्वी जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे ४० हजार पगार असणारास वीस हजार रुपये पेन्शन मिळत होती. नव्या पेन्शन योजनेप्रमाणे ही रक्कम सांगता येत नाही. जुन्या पेन्शनमध्ये पेन्शन कापली जात नव्हती, नवीन पेन्शन योजनेमध्ये टक्केवारीमध्ये ही पेन्शन कापली जात आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. याबाबत सरकारने मागण्या मान्य कराव्यात यासाठी खास संप सुरू करण्यात आला आहे. सरकारने मात्र संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.