

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील आणखी एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला आटपाडी परिसरातून फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. मुलीच्या कुटुंबीयांनी याबाबतची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये आज दिली आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, आटपाडी परिसरातील १४ वर्षे १० महिने वयाची अल्पवयीन मुलगी २३ फेब्रुवारी रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून चुलत्याच्या घरी जाऊन येतो असे सांगून राहत्या घरातून निघून गेली आहे.ती अद्यापपर्यंत घरी आली नसून तिला कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी कारणावरून फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद तिच्या कुटुंबीयानी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये आज दिली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्धन घटनेचा तपास करीत आहेत. दरम्यान अशा घटना वाढत असून त्यामुळे पालक वर्ग हादरला आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या