

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील विठ्ठलनगर,आटपाडी येथील २६ वर्षीय विवाहितेचा हुंड्याच्या कारणावरून पती,सासू व सासरे यांनी छळ केला असल्याची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, विवाहितेचा पती पवन अजित पवार याने विवाहितेस माहेरून हुंडा म्हणून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच विवाहितेच्या आई-वडिलांनी दि.२५ सप्टेंबर २०२१ रोजी तिच्या आईच्या कानातील सोने विकून अहा हजार रुपये पतीस सुरूर येथे घरी दिले होते.
सासू रंजना अजित पवार व सासरा अजित अंबादास पवार (तिघेही रा.सुरूर ता.वाई जि. सातारा) यांनी विवाहितेस माहेरकडून दोन लाख रुपये घेऊन ये तरच तुला आम्ही नांदवेल, नाहीतर तुला आम्ही नांदवणार नाही,असे म्हणून शिवीगाळ केली.तसेच ती माहेरी असताना तिच्यासह नातेवाईक भाऊ विशाल रामांना शिलपी, त्याची पत्नी शोभा विशाल शिलपी, चुलते लक्ष्मण यल्लाप्पा शिलपी, चुलत भाऊ रोहन लक्ष्मण शिलपी तसेच अकलूज येथील मामी मालती अंबादास ओलसे यांना विवाहितेच्या पतीने फोन करून शिवीगाळ करून व त्यांचे व्हाट्सअप इंस्टाग्रामवर वाईट वंगाळ व अश्लील मेसेज पाठवीत आहेत, अशा स्वरूपाची फिर्याद विवाहितेने आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.
सदरची घटना लग्नानंतर सुमारे एक वर्षापासून विवाहितेच्या सासरी सुरूर तसेच माहेर आटपाडी येथे घडली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल ठोंबरे घटनेचा तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या