

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे.
घटनेबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,आटपाडी तालुक्यातील एका गावामधील १४ वर्षे दोन महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने दि. २० फेब्रुवारी रोजी ११ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणत्यातरी कारणावरून फुस लावून पळवून नेले आहे. याबाबतची फिर्याद आज मुलीच्या नातेवाईकांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्धन घटनेचा तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या