

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथील फौजदारी न्यायाधीश मा.विनायक पाटीलसो यांनी आरोपी उत्तम शंकर माळी यास धनादेश न वटल्याच्या दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये एक वर्षाची व तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली.
याबाबत माहिती अशी की, आटपाडी येथील सिद्धनाथ चित्रमंदिरचे मालक मयत शंकर तुकाराम कदम यांना त्यांच्याच लॉजवर मॅनेजर असणारा उत्तम शंकर माळी याने उसनवार रकमेपोटी ९ लाख रुपयांचा धनादेश दिलेला होता. तो धनादेश वटला नाही म्हणून मयत शंकर कदम यांनी २०१८ साली ॲड.चेतन जाधव यांचेमार्फत आटपाडी फौजदारी न्यायालयात खटला दाखल केलेला होता. त्याचा निर्णय होऊन आटपाडी येथील फौजदारी न्यायाधीश मा. विनायक पाटीलसो यांनी आरोपी उत्तम माळी यास १२ लाख ४९ हजार रुपयाचा दंड करून एक वर्षाची साधी शिक्षा सुनावली. तसेच दंड नाही भरला तर पुन्हा तीन महिन्याची साधी शिक्षा सुनावली आहे.
तसेच आरोपी उत्तम माळी याने संजय आप्पासो बाबर रा. चोपडी यांना देखील उसनवार रकमेपोटी तीन लाख रुपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश वटला नाही, म्हणून संजय बाबर यांनीदेखील आरोपी उत्तम माळी याच्याविरुद्ध आटपाडी फौजदारी न्यायालयात खटला दाखल केलेला होता. त्याचाही निर्णय होऊन न्यायाधीश पाटील यांनी आरोपी उत्तम माळी यास तीन महिन्याची साधी तुरुंगवासाची शिक्षा व रक्कम रुपये चार लाख ४५ हजार रुपयांचा दंड सुनावलेला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद सुनावलेली आहे.
मयत शंकर कदम व संजय बाबर यांच्यातर्फे दोन्हीही खटल्यांचे कामकाज आटपाडी येथील ॲड.चेतन व्ही. जाधव यांनी पाहिले.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या