


वडूज पोलिसांची मोठी कारवाई
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
वडूज
वाकडवाडी तालुका खटाव येथील शेतात लावलेला तब्बल 75 किलो अफू वडूज पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे याबाबत वडूज पोलीस स्टेशनमध्ये तिघांवर आपुची शेती केल्याप्रकरणी अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की वाकळवाडी तालुका खटाव येथील शिवारात सुमारे एक गुंट्या मध्ये अफूची लागवड केली असल्याची माहिती वडूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी संबंधित ठिकाणावर कर्मचाऱ्यां सह छापा टाकला. या छाप्या दरम्यान वाकळवाडी शिवारात शांताराम रामचंद्र मोप्रेकर ,चंद्रप्रभा शिवाजी मोप्रेकर,विमल पंढरीनाथ म्होप्रेकर सर्व राहणार वाकळवाडी यांनी स्वा मालकीच्या शेतात त्यांच्या शेताच्या मधोमध गहू हरभरा कांदा पिकाच्या आडोशाला महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले मानवी शरीरास अपायकारक असणारे गुंगीकारक अफूची लागवड करून त्याचे आर्थिक हिता करता संवर्धन व जोपासना केल्याचे दिसून आले. सदर पिक लागवडीनंतर सुमारे दोन ते अडीच फूट उंचीचे ओलसर हिरवीगार पान त्यांना पांढरे फुले व हिरवे गोलाकार बोंडे असलेली पान फुलांचे तयार झालेल्या सात गोण्या त्याचे वजन 75 की ग्रा त्याची किंमत एक लाख 52 हजार 700 असा माल वडूज पोलिसांना आढळून आला. औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम कलमानुसार वडूज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचा मार्गदर्शनाखाली स पो नि मालोजीराव देशमुख,पोलिस उपनिरीक्षक शितल पालेकर, दादा देवकुळे,संदीप शेडगे, दर्याबा नरळे, दीपक देवकर,भूषण माने,शिवाजी खाडे, सागर बदडे, मेघा जगताप, वृषाली काटकर यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर यांनी दिली असून अधिक तपास अधिक तपास मालोजी राव देशमुख करत आहेत.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या