आटपाडी येथून मोटर सायकलची चोरी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथून महेश चांडवले यांची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना काल घडली. याबाबतची फिर्याद त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.
आटपाडी येथील महेश गोरख चांडवले यांची बजाज डिस्कवर कंपनीची मोटर सायकल क्रमांक एम.एच.10 बीएस 9604 दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान आटपाडी येथील पाटील हॉस्पिटल यांचे हॉस्पिटलसमोरुन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली.घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पोलीस हेडकॉन्स्टेबल संकपाळ तपास करीत आहेत.