माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील नात्याला काळीमा फासणारी घटना

सख्या मुलांनीच जन्मदात्या पित्याचे मोडले दोन्ही पाय
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव

माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील शेटेवस्ती येथे ८ फेब्रुवारी रोजी नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. यामध्ये शशीकांत बाळकृष्ण सातपुते वय ५६ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबात जमीन वाटपावरुन माळशिरस दिवाणी न्यायालयात वाद सुरु आहे. वडील जमीन वाटप करुन देत नाहीत म्हणुन ८ फेब्रुवारी रोजी वडील शशिकांत बाळकृष्ण सातपुते हे शेटेवस्ती येथील सकाळी १०-४५ च्या सुमारास आपल्या घरासमोर बसले असते मुलगा ज्ञानेश्वर शशीकांत सातपुते,संगम शशिकांत सातपुते, अनिता ज्ञानेश्वर सातपुते, अनुराधा संगम सातपुते व अलका शशिकांत सातपुते हे त्यावेळी घरीच होते. यामध्ये संगम ज्ञानेश्वर सातपुते यांनी वडील शशिकांत सातपुते यांना कवळयात धरुन खाली पाडुन अंगावर बसुन हयाला जमीनीचे वाटप करुन दे म्हणून वारंवार मागणी करुनही हा वाटप करुन देत नाही याला आज जिवंतच ठेवायचे नाही म्हणून शिवीगाळ करत तर दुसरा मुलगा ज्ञानेश्वर हयाने हा लय वळवळ करत आहे याला आता जिवंत सोडायचे नाही म्हणून त्याच्या हातातील हातोड्याने वडील शशिकांत यांच्या दोन्ही पायावर हातोड्याने मारुन पायाच्या हाडाचा चुरा करुन पाय फकचर केले आहेत.तर सुन अनिता हिने लोखंडी पाईपने तर दुसरी सुन अनुराधा हिने काठीने दोन्ही पायावर जोरदार मारहाण केली तर पत्नी अलका हिने काठीने कमरेवर व उजव्या हाताच्या पंजावर मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर शशिकांत हयांची मुलगी धनश्री हिला शिवीगाळ दमदाटी करुन हाताने लाथा बुककयाने मारहाण केली आहे. अशया आशयाची तक्रार शशिकांत बाळकृष्ण सातपुते यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात ९ फेब्रुवारी रोजी दिली आहे. याप्रमाणे माळशिरस पोलीस ठाण्यात गु रजि नं ६५/२०२३ भादवि कलम ३०७,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे पाचही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहहयाक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके हे करीत आहेत.
चांदापुरी येथील अशया प्रकारच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेचा समाज्यातील सर्व स्तरावरील घटकामधुन निषेध व्यक्त केला जात आहे. कारण जन्मदात्या पित्याचे दोन्ही पाय जमीनीसाठी जिवंत पणे मोडणे एवढी कु्रता माणसामध्ये आहे हे हया घटनेने दाखवुन दिले आहे. शेवटी वडिलांच्या मृत्युनंतर त्या जमीनीचे वारसदार मुलगा,पत्नी, मुलगीच आहे दुसरे कोण वारस आहेत ?