

दोन दिवसात शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव
माळशिरस तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवाना अकलुज विभाग महावितरणने दोन दिवसात शेतीपंपाचे लाईट बिल भरावे अन्यथा दोन दिवसांनी शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. सध्या माळशिरस तालुक्यात आजपासून शेतपंपासाठी फक्त दोन तासच विद्युतपुरवठा करणयात येणार आहे. जर दोन दिवसात शेतकऱ्यांनी प्रती एच पी एक हजार रुपये म्हणजेच तिन एचपी साठी तिन हजार रुपये, पाच एचपी साठी पाच हजार, सात एचपी साठी सात हजार, दहा एचपी साठी दहा रुपये ताबडतोब भरावेत अन्यथा दोन दिवसानंतर विजपुरवठा पुर्णपणे खंडीत करणयात येणार असल्याचे वेळापुर येथील उपकार्यकारी अभियंता महावितरण कंपनी यांनी सांगितले. खरे या अगोदर महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपने शेतकऱ्यांनचा विजपुरवठा खंडीत करु नये यासाठीं संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार आंदोलन केली होती.मग आता भाजपा सरकार सत्तेत आहे मग आता विजबिलासाठी शेतकऱ्यांच्या मागे तगादा का लावला आहे. अशी विचारणा शेतकऱ्यांनमधुन होत आहे. सध्या एक तर उन्हाळयाचे दिवस आहेत पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे आणी आता महावितरणच्या हया निर्णयाने लाईटच नसल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यायचे हा शेतकऱ्यांनपुढे मोठा अडचणीचा प्रश्न आहे. अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना महावितरण चांगलाच शाक् दिला आहे. याविषयी पिलीव महावितरणचे सहहयाक अभियंता थोरात यांना विचारले असता आम्हला वरुन आदेश आहे .दोन दिवस दोन तास वीजपुरवठा करणार आहे त्यानंतर विजपुरवठा खंडीत करणार असल्याचे सांगीतले.
महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळचे विरोधी पक्षनेते व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यप्रदेश सरकारने शेतकऱ्यांनचे संपूर्ण लाईट भरुन माफ केले मग महाराष्ट्र सरकार दररोज सावकारी पद्धतीने लाईट बिल वसुली करीत आहे ही किल्प सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागली आहे. चौकट – माळशिरस मतदार संघाचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांनी तर महाविकास आघाडीचे सरकार असताना ज्यावेळी विजपुरवठा खंडीत केला होता त्यावेळेस माळशिरस येथे रस्ता रोको आंदोलन करुन सरकारवर जोरदार हल्ला बोल केला होता आणी भाजपा सरकार असताना पाच वर्षात शेतकऱ्यांना विज बिल कधीच मागीतले नव्हते.मग आता भाजपचे सरकार आहे आ रामभाऊ सातपुते काय भुमीका घेतात याकडे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनबरोबर इतर शेतकऱ्यांनचे त्यांच्या भुमीकेकडे लक्ष लागले आहे. आज आमदार रामभाऊ सातपुते यांच्याशी याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आज महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे यानिमित्त महावितरणने शेतकऱ्यांना गिफ्ट दिले की काय अशी शेतकऱ्यांनमध्ये चर्चा.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या