

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
राहुरी
राहुरी तालुक्यातील बारगाव नांदुर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी महिला समुदाय वैद्यकीय अधिकारी यांना कामाचा मोबदला १० हजार लाच स्वीकारताना डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी, कोरडे, वय – ३९ वर्ष यांना अहमदनगर येथिल लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले. याबाबत पोलिस सुञाकडून समजलेली माहिती अशी की, तक्रारदार महिला हि समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस असुन, त्यांचा माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ या दोन महिन्यांचा कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्ता व आक्टोबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळणे करिता तक्रारदार महिलेने बारगाव नांदुर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी- कोरडे या लोकसेविका यांची दोन महिन्यांपूर्वी भेट घेऊन विचारणा केली असता त्यांनी तुला मिळणाऱ्या रक्कमेच्या निम्मी रक्कम मला द्यावी लागेल असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार महिलेने मागील एक महिन्यापूर्वी या लोकसेविका यांना भेटल्या असता त्यांनी आज काहीतरी रक्कम दिली तरच मी तुझ्या बिलासंबधी पुढील कारवाई करण्यास सांगते. तक्रारदार महिलेने नाईलाजाने जवळ असलेले ४५०० रुपये लोकसेविकेस दिले. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांनी आरोपी लोकसेविका यांची भेट घेऊन बिलासंदर्भात विचारणा केली असता तुला मिळणाऱ्या बिलाची निम्मी रक्कमेची मागणी केली व तडजोड १० हजार देत असेल तरच तुझे बिल काढले जाईल तक्रारदार महिला यांनी बारगाव नांदुर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी-कोरडे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. ६ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली. डॉ वृषाली तुळशीराम सूर्यवंशी- कोरडे यांनी तक्रारदार महिलेकडे १० हजारची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी बारगाव नांदुर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारी २ वाजता डॉ वृषाली तुळशीराम सूर्यवंशी- कोरडे त्यांच्या दालनात तक्रारदार महिले कडून १० हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. राहुरी पोलिस ठाण्यात डॉ.वृषाली तुळशीराम सूर्यवंशी- कोरडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ला. प्र. वि. नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर – घारगे अपर पोलीस अधीक्षक नारायण न्हाहळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी काम पाहिले. तर सापळा पथकात पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, चालक पोलीस हवालदार हरुन शेख आदी सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या