सांगोला- पुणे एसटी बस सुरु करण्याची प्रवाशयांची मागणी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव

सांगोला आगाराची सांगोला पुणे ही बस अनेक वर्षापासून सुरु होती .मात्र गेल्या काही दिवसापासून ही बस सांगोला आगाराने बंद केल्यामुळे प्रवासी, विदयार्थी ,नोकरदार यांची प्रचंड गैरसोय होत आहे. सांगोला आगाराची ही बस सांगोला – महुद- साळमुखवाडी – पिलीव – म्हसवड- शिंगणापूर – फलटण मार्गे स्वारगेट ( पुणे) हया मार्गे दररोज जात होती यामुळे अगदी सांगोल्यापासुन,पिलीव, म्हसवड व आसपासच्या खेडोपाडयातील पुणे येथे शिक्षणासाठी जाणारे विदयार्थी, नोकरदार किंवा सर्वसामान्य नागरिकांना पुणे याठिकाणी जाण्यासाठी किंवा पुण्याहुन येण्यासाठी नागरिकांना या बसचा फार फायदा होत होता.

तशी अनेक वर्षापासून ही एस टी बस सुरळीतपणे सुरु होती पण सांगोला आगाराने सदरची बस अचानक बंद केल्यामुळे विदयार्थी, नोकरदार ,प्रवासी यांची गेल्या काही दिवसापासून प्रचंड गैरसोय होत आहे. अगदी शिंगणापूर याठिकाणी महादेवाला जाण्यासाठी सुद्धा या बसचा फार फायदा होत होता पण अचानक ही एसटी बस बंद केल्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी ही एस टी बस ताबडतोब सुरु करण्याची मागणी विदयार्थी, प्रवासी यामधुन होत आहे.